१५ लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरुन १५ लाख रुपये आणण्यासाठी छळ झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह तीन जणांवर  शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरातील माहेर असलेल्या रुपाली सचिन शेंद्रे यांचा अमरावती जिल्हातील परतवाडा येथील सचिन रामेश्वर शेंद्रे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर २४ फेब्रुवारी २०२१ ते ८ नोव्हेंबर २०२२ या काळात रुपाली हिने माहेरुन १५ लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिचा पतीसह सासरच्यांनी शिवीगाळ तसेच माहराण करत शारिरीक व मानसिक छळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान छळाला कंटाळून रुपाली ह्या माहेरी निघून आल्या. त्यांनी मंगळवारी याबाबत शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून रुपाली हिचे पती सचिन शेंद्र, सासू मनोरमा रामेश्वर शेंद्रे, सासरे रामेश्वर नागोराव शेंद्रे सर्व रा. परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद विनायक पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.