तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार; तिघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यकांत विक्की बागडे (वय १७, रा. जाखणी नगर, कंजरवाडा, जळगाव) हा भाऊ घनश्याम विक्की बागडे आणि आई निलम बागडे यांच्यासह राहतो. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजता धनश्याम बागडे याला कासमवाडी येथे ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर (पुर्ण नाव माहिती नाही) सर्व रा. कासमवाडी जळगाव यांनी काहीही कारण नसतांना मारहाण केली.

या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दिव्यकांत बागडे याला तिघांनी मारहाण केली. यात ललित दिक्षीतने त्याच्या हातातील तिक्ष्ण हत्याराने वार करून दिव्यकांत याला जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या दिव्यकांतची आई निलम बागडे यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली व जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिली.

याप्रकरणी ११ एप्रिल रोजी सोमवारी दिव्यकांत बागडे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी ललित दिक्षीत, भोजा आणि मयूर (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. कासमवाडी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.