“एल.एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूल” मध्ये ग्रामसंवाद सायकल यात्रेचे जंगी स्वागत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिनांक 30 जानेवारी सोमवार रोजी वावडदे, महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव तर्फे आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेची सुरुवात एल.एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदे येथुन करण्यात आली. सर्व यात्रेकरुंचे जंगी स्वागत शाळेकडून करण्यात आले. यात्रेदरम्यान “मोहन ते महात्मा” या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र व स्वातंत्र्यसंग्रमातील महत्त्वाच्या घटना यांचे ज्ञान प्राप्त झाले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व विभाग प्रमुख सुजीता साळुंखे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उमेश महाजन, गिरीश कुलकर्णी, डॉ. झाला वरिष्ठ गांधीवादी अब्दुल भाई यांची उपस्थिती लाभली होती.

सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले, त्यानंतर हुतात्मा दिवसाच्या अवचित्य साधून सर्व स्वातंत्र्य सेनानी यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देण्यात आली. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी स्वागत केले या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना गांधीजींच्या जीवनावरील पुस्तके बक्षीस देण्यात आले होते.

इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माहितीस्तव पपेट शो चे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसंवाद सायकल यात्रेसाठी आलेल्या सर्व सदस्यांची भोजनाची व्यवस्था शाळेमार्फत करण्यात आली होती. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दीपक सराफ यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका जयश्री पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता ग्राम समाज सायकल यात्रेच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.