Tuesday, November 29, 2022

तापी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या विवाहितेचा बुडून मृत्यू

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांनी आंघोळीसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी विवाहितेचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उशीरापर्यंत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

- Advertisement -

विद्या प्रल्हाद पाटील रा. पिंपळे सिम ह.मु. चोपडा जि.जळगाव असे मयत महिलेचं नाव आहे. विद्या पाटील ह्या पती प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्यासह चोपडा येथे राहतात. १ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी असल्याने गल्लीतील महिलांसोबत विद्या पाटील देखील गेल्या होत्या. चोपडा-धरणगाव रस्त्यावरील तापीनदीजवळ दादाई मंदीराजवळ असलेल्या तापीनदीच्या पायऱ्यांजवळ उतरल्या.

दरम्यान नदीच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात बुडाल्या.  त्यांचा मृतदेह तांदलवाडी गावाजवळील नदी किनारी आढळून आला. नातेवाईकांनी मयत महिलेची ओळख पटविली असून याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

मयत महिलेच्या पश्चात सासरे गोपीचंद नथ्थू पाटील, पती प्रल्हाद पाटील, दीर, आई, वडील असा परिवार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या