जळगाव जिल्ह्यातील ११ गावांमध्ये १२ रोजी पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा

0

ग्रामस्थानी घेतला केंद्राच्या १७ योजनांचा लाभ

जळगाव ;– जिल्ह्यात पंतप्राधन नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा रथ विविध गावांमध्ये पोहचत असून केंद्र शासनाच्या १७ योजना वंचित असलेल्या लाभार्थ्यानपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. हा रथ १२ रोजी जिल्ह्यातील ११ गावांमध्ये पोहचून ग्रामस्थाना याचा लाभ मिळत आहे.

आज १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेआधी धरणगाव तालुक्यातील चावल खेडे , अमळनेर तालुक्यातील पिंपळे बुद्रुक, चोपडा तालुक्यातील मंगरूळ, भडगाव तालुक्यातील वडजी, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी ,भडगाव तालुक्यातील पांढरद ,चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक ,जळगाव तालुक्यातील डिकसाई ,चाळीसगाव तालुक्यातील घोडसगाव, जळगाव तालुक्यातील रीधुर आदी ११ गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा रथाने भेट दिली . याप्रसंगी रथाच्या स्वागतासाठी सर्वा गावांचे सरपंच,सदस्य ,ग्रामसेवक आणि ग्रामस्थानी स्वागत केले.

आज १३ रोजी या गावांमध्ये पोहचेल विकसित भारत संकल्प यात्रा रथ

यावेळी केंद्र शासनाच्या १७ योजनांची माहिती आणि त्याचा लाभ ग्रामस्थानी कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान उद्या विकसित भारत संकल्प यात्रा धरणगाव तालुक्यातील सोनवद बुद्रुक, अमळनेर तालुक्यातील कटाळे, चोपडा तालुक्यातील माचले ,भडगाव तालुक्यातील पिचर्डे ,चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण ,चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक ,अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द ,जळगाव तालुक्यातील देऊळवाडे, धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द ,चाळीसगाव तालुक्यातील राज दहिरे, भडगाव तालुक्यातील शिवानी आणि जळगाव तालुक्यातील सुजदे येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन होणार आहे. तरी नागरिकांनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ या माध्यमातून घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.