जळगाव मनपा नगरसेवकांना निधीच्या वितरणास विविध संघटनांचा विरोध

0

जळगाव ;- महापालिकेतील नगरसेवकांची आता मुदत संपत असून त्यांना वार्षिक विकास योजना तसेच महानगरपालिका फंडातून नगरसेवकांना निधीचे वितरण केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या निधीचा वापर विकास कामांसाठी कमी होईल. गैरव्यवहार करुन तो पैसा निवडणुकीत वापर जाईल असा संशय करुन या निधीच्या वितरणास विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. निधीचे वितरण झाले तर उच्च न्यायालयात जाऊ असा इशारा ॲड.विजय दाणेज यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या निधीच्या संदर्भात सोमवारी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पद्मालय शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. घनश्याम कोचुरे- लोकशक्ती प्रतिष्ठान
आम आदमी पार्टी- अमृता नेटकर हिंदू मुस्लीम एकता फाऊंडेशन – युसूफ खान डॉ. घनश्याम कोचुरे फाऊंडेशन – सरला सैंदाणेतांबापुर फाऊंडेशन – मतीने पटेल अमन फाऊंडेशन- काद्री ,साहिल फाऊंडेशन – साहिल पटेल भारत मुक्ती मोर्चा – निकम बहुजन मुक्ती पार्टी- विजय सुरवाडे ,आव्हाने फर्स्ट फाऊंडेशन – नामदेव पाटील ,सिराज मूलतानी फाऊंडेशन – सिराज मूलतानी हिंदू मुस्लीम एकता पेंटर युनियन – इस्माईल खान ,बहुजन क्रांती मोर्चा – सुनील देहाडे ,बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क – सुमित्रा अहिरे छत्रपती क्रांती सेना – देवानंद निकम , विचारदीप फाऊंडेशन – विवेक सैंदाणे भीम आर्मी – आबा मोरे यांच्यासह १६ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या निधीच्या संदर्भात सीसीसी कलम ८० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना नोटीस देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.