नदीच्या पात्रात आढळला अज्ञात मृतदेह, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील गोळेगाव येथे सुसरी नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग इंगळे व पोलिस उपनिरीक्षक दोडके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी जामोद पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. सुसरी नदीपात्रातील बंगाली काट्यांमध्ये पडला होता. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांना बोलावून घटनास्थळी पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृहदेह नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दोडके करीत हे.

Leave A Reply

Your email address will not be published.