जळगाव जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0

जळगाव ;- येथील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे पत्रक राज्य शासनाने काढले आहे. तसेच, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना मुदतवाढ देण्यात आली असून बाहेरील जिल्ह्यातून ५ अधिकारी जळगावात येणार आहेत.

बदल्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक उतेकर यांची बदली ठाणे येथे तर पहूर पोलीस स्टेशन येथील प्रतापराव इंगळे यांची जालना येथे झाली आहे. अनिल कटके यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे.

तसेच, महेश शर्मा हे नांदेडवरून, विशाल जयस्वाल हे गडचिरोली येथून, बबन जगताप लातूरहून जळगावात येत आहेत. यांच्याशिवाय सुनील पवार धुळ्यावरून आणि सचिन सानप हे मुंबई शहर येथून जळगावात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.