जळगाव ;- ४८ वर्षीय महिला घरासमोरील अंगणात झोपलेली असताना दोन अज्ञात चोरटयांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि कानातील पेंडल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यातील वावडद येथील शेकाम करणाऱ्या आशाबाई मुरलीधर जाधव वय ४९ ह्या १६ जून रोजी रात्री घरासमोरील अंगणात झोपलेल्या असताना दोन अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या गळ्यातील १० ग्राम वजनाचे ४६ हजार ५०० रुपयांचे मनी , मंगळसूत्र पोत आणि ४ ग्राम वजनाचे २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे कानातील पेंडाल असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला . याबाबाबत आशाबाई जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना प्रदीप पाटील करीत आहे.