सर्वाधिक उंचीच्या पुण्याच्या कुळकर्णी फॅमिलीची रोटरी क्लबतर्फे उद्या मुलाखत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील रोटरी क्लब जळगावतर्फे सर्वाधिक उंचीचे अनेक जागतिक विक्रम नावावर असलेल्या पुणे येथील कुळकर्णी परिवाराच्या जाहीर मुलाखतीचे शुक्रवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. टेलीफोन ऑफिस जवळील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरीच्या या मुलाखतीत कुळकर्णी परिवारातील या चौघांना दैनंदिन जीवनात, प्रवास करताना येणार्‍या अडचणी, त्यांचे कपडे व इतर वस्तूंची खरेदी, आवडी-निवडी, गंमतीशीर प्रसंग आदी माहिती व प्रश्‍न विचारले जाणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.