“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” संपन्न

उत्तर महाराष्ट्र व नांदेड विध्यापिठाचे माजी कुलगुरूंची उपस्थिती ; ८११ स्‍नातकांना पदवी बहाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट विद्यालयाच्या “ऑटोनॉमस” (Autonomous) झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीप्रदान सोहळा दिनांक १० एप्रिल सोमवार रोजी महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास संपन्न झाला. या सोहळ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर (Prof. Dr. Pandit Bhalchandra Vidyasagar), कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी (Dr. Vijay Maheshwari) हे अध्यक्षस्थानी तर रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी (Pritam Raisoni) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डॉ. शेखर रायसोनी, विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती, प्रा. राहुल कुलकर्णी, सॅनट्रोनिक्स प्रा. ली. या आयटी कंपनीचे संचालक उमेश सेठिया, रायसोनी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे, प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले.

या समारंभाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांचे व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय “स्वायत्त” या एक्सलन्स पातळीला गाठू शकले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडली नाही तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील असल्याने आपल्या भागातील विध्यार्थ्यांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासत नाहीए तसेच २०२०-२१ व २०२१-२२ या काळात बरेचेसे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहेत.

डाटा सायन्स, ब्लॉक चैन टेक्नोलॉजी, बिजनेस अॅनलीटीक्स यासारख्या कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहे. या कोर्ससाठी रायसोनी महाविध्यालयाने एशियन इस्टीट्यूट ऑफ फॅमिली बिजनेस मॅनेजमेटसोबत करार केले आहे तसेच महाविध्यालयात ऑल इंडिया मॅनेजमेट असोसिएशनसोबत करार करून बिजनेस सिम्युलेशन लॅब स्थापन करण्यात आली आहे. यानंतर कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी पुढील आयुष्यात करण्याची गरज आहे.

आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते, आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच आता या वयातच फिटनेसची सवय लाऊन घ्या व आपले छंद झोपासा, रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला असून नॅक “ए” ग्रेडनेही हे इस्टीट्यूट सन्मानित आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागातील विध्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी नमूद केले कि, माणसाच्या मनात कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असेल तर तो जगातील कोणतेही मानाचे स्थान प्राप्त करू शकतो. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून मागील वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एमबीएचे १८९, आयएमसीएचे ७५, एमएमएसचे ०७, बीबीएचे २५९, बीसीएचे २५९, डीएमसीएचे २२ असे सर्व शाखेचे एकूण ८११ पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातून मागील वर्षी शिकून गेलेले पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१० विद्यार्थ्यांनी केली सुवर्ण पदकांची कमाई
एमबीए-२०२०-२१ यावर्षात कपिल बटूसिंग परदेशी तर २०२१-२२ मध्ये ज्ञानल रवींद्र बोरोले, आयएमसीए-सागर कांतीलाल पाटील, एमएमएस-आशिष शामलाल कुकरेजा, बीबीए-२०२०-२१ यावर्षात मुस्कान सुनीलकुमार मंधान तर २०२१-२२ मध्ये ख़ुशी गणेश रावलानी, बीसीए-२०२०-२१ यावर्षात लिसा महेश मांधवाणी तर २०२१-२२ मध्ये दिप्ती धनराज जाधव , बीसीए इंटेग्रेटेड- निकिता सुनील रायपुरे, ड्युअल एमसीए-साक्षी कमलेश अग्रवाल

Leave A Reply

Your email address will not be published.