“हिरक महोत्सवाच्या” निमित्ताने पत्रकार महिलांचा सत्कार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

महिला दिनानिमित्त जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारीता क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा करण्यात आला. हा गौरव सोहळा आम आदमी पार्टी महिला युवा अध्यक्ष अमृता नेतकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील या उपस्थित होत्या.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दै.लोकशाही संपादिका शांता वाणी, या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली ती महापौर जयश्री महाजन यांनी, तसेच प्रा.एड.विजेता सिंग, डॉ.सविता नंदनवार, निलोफर देशपांडे, कविता नेतकर ह्या उपस्थित होत्या. यावेळी जळगावातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील पत्रकार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.