अवकाळी पावसाने शेतकरी चिंताग्रस्त

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्यातरी राज्यभरात अवकाळी पावसाचे संकट आपल्याला बघायला मिळाले आहे. मात्र या पावसामुळे शेतकरी मात्र त्रासाला आहे. जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, अमळनेर, पारोळा तालुक्यातील काही गावांमध्ये सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाने (Rain) हजेरी लावली. यात काही ठिकाणी गहू, मका पीक आडवे झाले. तर इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ह्या अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी हताश झाले आहे. सोबतच कापसाला योग्य भाव न मिळाल्याने सुद्धा अडचणीत वाढ झाली आहे. हे संकट दूर होत नाही तोच दुसरे अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. रब्बी हंगाम जोरात होता. मात्र अवकाळी वादळी वाऱ्यामुळे तीही आशा आता मावळली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.