अजित पवारांनी जाहीर केला राष्ट्रवादीचा जाहीरनामा

0

मुंबई ;- पंतप्रधान मोदी म्हणजे एनडीएचा विश्वासू चेहरा आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ अशी घोषवाक्य असलेला आणि कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत. तसंच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार, यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा याकरता शिफारस करणार , शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थित असली पाहिजे , आपरंपरिक वीजनिर्मिती करणार. खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर पर्यावरणाचं संकट थोपवायचं असेल तर वीजनिर्मिती युनिट, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ, जातनिहाय जनगणनेचा प्रश्नमार्गी लावणार, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा आदी घोषणा करण्यात आल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.