प्रवाशांसाठी खुशखबर ! मध्य रेल्वे होळी स्पेशल ट्रेन चालवणार

0

भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क 

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार होळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

१) पुणे ते दानापूर विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०१४७१ पुणे ते दानापूर विशेष गुरुवार दिनांक २१.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे ११.४० वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक ०१४७२ दानापूर ते पुणे विशेष शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १३ ३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पुणे येथे १९.४५ वाजता पोहचेल.

थांबे -:हडपसर, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चोकी, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंकशन, बक्सर, आणि आरा.

संरचना: १ वातानुकूलित श्रेणी , २० शयनयान

 

२) पुणे ते गोरखपूर विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०१४३१ पुणे ते गोरखपूर विशेष शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ रोजी पुणे येथून १६.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गोरखपूर येथे २१.०० वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक ०१४३२ गोरखपूर ते पुणे विशेष शनिवार दिनांक २३.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून २३.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे येथे ०६.२५ वाजता पोहचेल.

थांबे -: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई जंकशन, ओराई, कानपुर, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खालिदबाद

संरचना: १ वातानुकूलित श्रेणी , २० शयनयान

 

३) मुंबई ते गोरखपूर विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०१०८३ मुंबई ते गोरखपूर विशेष शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ रोजी मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी गोरखपूर येथे ०९.३० वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक ०१०८४ गोरखपूर ते मुंबई विशेष रविवार दिनांक २४.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून १५.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मुंबई येथे ००.४० वाजता पोहचेल.

थांबे -: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई जंकशन, ओराई, कानपुर, लखनौ, बाराबंकी, गोंडा आणि बस्ती

 

४) मुंबई ते दानापूर विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०१२१५ मुंबई ते दानापूर विशेष गुरुवार दिनांक २१.०३.२०२४ रोजी मुंबई येथून ११.२५ वाजता वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे १४.०० वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक ०१२१६ दानापूर ते मुंबई विशेष शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १९.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मुंबई येथे ०३.५० वाजता पोहचेल.

थांबे -: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज चोकी, पंडित दिन दयाळ उपाध्याय जंकशन आणि बक्सर

 

५) पनवेल ते छपरा विशेष ट्रेन

गाडी क्रमांक ०५१९४ पनवेल ते छपरा विशेष शुक्रवार दिनांक २२.०३.२०२४ आणि २९.०३.२०२४ रोजी पनवेल येथून २१.४० वाजता सुटेल तिसऱ्या दिवशी छपरा येथे ०८.५० वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक ०५१९३ छपरा ते पनवेल गुरुवार दिनांक २१.०३.२०२४ आणि २८.०३.२०२४ रोजी छपरा येथून १५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पनवेल येथे १५.२० वाजता पोहचेल.

थांबे -: कल्याण, इगतपुरी, नासिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, बनारस, वाराणसी, गाजीपूर सिटी आणि बालिया

संरचना : – १४ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२२ डब्बे).

 

आरक्षण: होळी विशेष गाडी क्र. 01471, 01431, 01083, 01215 आणि 05194 यांचे बुकिंग विशेष शुल्कासह दि. १६.०३.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.