लोकशाही न्यूज नेटवर्क
अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू हिंदू भूषण श्याम महाराज यांनी येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मियांनी आपला धर्म हिंदू धर्म म्हणून लिहावा असे आवाहन केले. काही देशविघातक शक्तिकडून हिंदू समाजात फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचे षडयंत्र चालू केले आहे त्याला आपण बळी ना पडता आपली ओळख हिंदू हीच असली पाहिजे असे सांगितले.
कुंभाच्या 5 व्या दिवशी धर्म सभेच्या मंचावर मा. अमर लिंगनाजी, पू.रायसिंगजी महाराज, पू. यशवंतजी महाराज, पू. नरोत्तम प्रकाश स्वामीजी, मा.भैय्याजी जोशी , पू. रामानंदचार्य राजराजेशवराचार्य गोपाल चैतन्य महाराज, पू, हिंदू भूषण श्यामजी महाराज, ह.भ.प. अर्जुन महाराज, पू.सिन्द्रराव महाराज, पू. कबिरदास महाराज, पू. बद्ददु नायक, पू. बाबूसिंग महाराज, पू.जितेंद्रनाथ महाराज, पू. कैलास महाराज उपस्थित होते.
अमर लिंगनाजी यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये घर वापसी झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, देशाला इस्लामी व इसाई बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, कुंभा नंतर तांड्यावर जाऊन प्रबोधन करणार असे स्पष्ट केले. रायसिंग महाराज यांनी आपण ही हिंदू आहोत वैदिक समाज ,संस्क्रुती आणि धर्म जपा असे सांगितले. यशवंत महाराज यांनी कुंभला विरोध करणाऱ्या चा चांगला समाचार घेतला .आपण एकत्र आले पाहिजे, एकजूट महत्वाची आहे. भारतातील बंजारा समाज एकत्र आले याचा काही जणांना त्रास होतो आहे, असे त्यांनी म्हंटले.
नरोत्तम स्वामीजी यांनी आपल्या उपदेशात बंजारा समाजाने आपला धर्म कधी त्यागला नव्हता, भगवान राम व कृष्णाचा सेवक आहे हा समाज आहे. आपण गौ सेवा करणारे आहोत .आपल्या सनातन धर्मावर निष्ठता ठेवा ,आपण सांप्रदाय आणि पंथात विखरले आहेत पण आपले इस्ट देव समान आहेत. हिंदुत्वचा मार्ग सोडू नका .
कर्नाटक येथील मंत्री प्रतापराव यांनी आपल्या भाषणात जे काम आम्ही करायला पाहिजे ते काम धर्म जागरण करत आहे.. घरवापसी करायला पाहिजे. तांड्यावर जा हिंदू धर्माची माहिती द्या .आपली सांस्कृतिक आणि स्वाभिमान जपा, हिंदू धर्माचे रक्षण करा ,मुलांना शिकवा पण धर्माची रक्षा करा .असे सांगितले
हिंदू समाजात विविध जाती, पण धर्म हिंदूच आहे – भैय्याजी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये धर्माच्या मार्गावर चालणारा समाज हिंदू समाज, आपला समाज निद्रा अवस्थेत जातो, कर्तव्य विसरतो तेव्हा संत आपल्याला जागृत करतात. ही जागरण प्रक्रिया निरंतर चालत राहिली पाहिजे. आज जगात कोण कुणा समोर झुकतो सर्व जाणतात. शक्ती समोर सर्व झुकतात. विना संघटन शक्ती नाही. आपल्याला जागृत पण व्हायचे आहे आणि संघटित पण व्हायचे आहे. पोशाख भिन्न असतील ,पूजा पद्धती भिन्नता असेल पण अंत:करणात आपण एकच हिंदू आहेत. एकच भाव सर्वांमध्ये जागृत करायचा आहे की आपण हिंदू आहोत . दृष्ट आणि हिंदू विरोधी शक्ती विरुद्ध सजग राहू .आपण वेगवेगळ्या जातीचे असलो तरी आपण हिंदू आहोत. आपल्याला बाहेरील शक्ती प्रभावित करू शकत नाही. आपल्याला आपले हिंदू धर्माचे संत प्रभावित करतात.
गोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या उपदेशात सकल बंजारा व सकल हिंदू समाज या कुंभात उपस्थित आहे. ज्या ज्या क्षेत्रात संत आहेत अशा सद्गुरूला शरण जा ,तुम्हाला ते सनातन धर्माची महिमा सांगत तुम्हाला मार्गदर्शन करतील .मग कुणाची ताकद नाही की, तुम्हाला धर्मपरिवर्तन होऊ देणार नाही. सनातन धर्म महान आणि मोठा आहे.
हिंदू भूषण श्याम महाराज म्हणाले की आम्ही किती दिवस धर्मांतराच्या समस्येवर रडत बसणार आहोत. आपलं खर काम कुंभ झाल्यावर असणार आहे. सर्वांनी आपल्या गावाकडे तांड्यावर गेल्यावर आपलं संघटन तयार करा. आपण संघटित झालो तर आपल्या गावात धर्मांतर साठी येण्याची कोणी हिम्मत करणार नाही. त्यासाठी धर्म जागरण सोबत मिळून काम करावं लागेल. येत्या जनगणनेत आपण सर्वांनी आपला धर्म हिंदू लिहा, तुम्ही हिंदू ना लिहण्यासाठी षडयंत्र सुरू आहेत. आपण सर्वांनी जागरूक राहायला हवं असे त्यांनी सांगितले.