जळगाव स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे दीडशे महिलांची आरोग्य तपासणी

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील जळगाव स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका व स्वच्छता करणाऱ्या दीडशे महिलांची सीबीसी, शुगर ,थायरॉईड, आणि बीएमडी या तपासण्या आरोग्य शिबिर आयोजित करून विनामूल्य करण्यात आल्या.

ज्या महिला कर्मचाऱ्यांना फक्त मुलीच आहे अशा 23 महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष डॉ. सीमा पाटील व सचिव डॉ.दीप्ती पायधन यांनी आरोग्याची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.

सहसचिव डॉ. शितल भोसले यांनी सूत्रसंचालन तर डॉ. प्रशांत पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ.प्रीती दोषी, डॉ. निलेश लाठी, डॉ.पुनम दुसाने, डॉ. स्वप्नील सैतवाल, डॉ. सुयश नवाल, डॉ. नीलिमा बोरोले, डॉ. भावना चौधरी, डॉ. प्रीती भारुडे आणि डॉ. अनिता बाविस्कर या स्त्रीरोगतज्ञांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.