आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, नवीन वेळापत्रक जारी होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आरोग्य विभागाची 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी होणारी राज्यातील ग्रामविकास विभागाच्या गट क अंतर्गत येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाची ही परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा दुय्यम निवड मंडळामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या आधी 15 आणि 16 ऑक्टोबरला या पदांसाठी परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. तर 17 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करून यासाठीच्या पात्र उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात येणार होती. आता ही परीक्षा रद्द करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.