छेडखानी केल्याच्या संशयावरुन वाद ; पोलीस कर्मचारी गंभीर

0

जळगाव ;- शहरातील शिरसोली रस्त्यावरील डी मार्ट मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये छेडखानी केल्याच्या संशयावरुन वाद झाला. या वादातून एका गटाने मॉलवर दगडफेक करीत गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या वादामुळे शिरसोली रस्त्यालगत काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेत एकाने पोलिसाच्या डोक्यात रॉड घातल्याने पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडीरोड वरील डी मार्ट येथे बुधवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन कुटुंब खरेदीसाठी आले होते. दोन्ही कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातचे रूपांतर थोड्यावेळात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे एका कुटुंबातील काही तरूणांनी डीमार्टमध्ये तोडफोड करण्यात आली. यावेळी वातावरण तापल्याने कोणताही अनुचित प्रकार होवून नये म्हणून डीमार्टच्या व्यवस्थापकांनी डीमार्ट शटर बंद करण्यात आले.

तरुणीने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली. हा वाद वाढतच असल्याने तरुणीने आपल्या वडीलांना फोन लावून मॉलमध्ये बोलावून घेतले. काही वेळाताच याठिकाणी जमाव जमा झाल्यामुळे मॉल परिसरात गोंधळ वाढला. त्यात जमावातील काही जणांनी मॉलमध्ये तोडफोड करत दगडफेक करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी संबंधित मॉलमध्ये पोहचले. तोडफोडीच्या प्रयत्नातील काही तरुणांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, काही तरुणांनी पोलिसांनाच मारहाण केल्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. यामध्ये रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय जाधव यांच्या डोक्यावर रॉड मारल्याने संबधित कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दोन्ही गटातील महिला व पुरुषांना ताब्यात घेत रामानंद नगर पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी देखील जमाव मोठ्या संख्येने जमा झाला होता. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरसीपी पथकाला पाचारण केले होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.