जैन समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी पेटींग विकत घेत गुंंजनला दिला आर्शिवाद

0

गुंजनच्या चित्रप्रर्दशनाचे थाटात उदघाटन
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
ओरियन स्कूलची ई ७ वी १३ वर्षीय गुंजन प्रसाद सावंत हिच्या चित्रांचे प्रदर्शनाचे उदघाटन माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, रा.प.म व्यवस्थापक निलीमा बागुल, ओरीयन सीबीएसई स्कुल प्राचार्य सुषमा कांची, पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स व्यवस्थापक संदीप पोतदार, कला शाळा संस्थापक तरूण भाटे,होंडा कटटाचे अध्यक्ष संतोष जैन,जैन इरिगेशनचे मिडीया विभाग प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते आज थाटात करण्यात आले.

यावेळी आर्शिवाद देतांना जैन समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कमी वयात तिच्या चित्रात प्रगल्भता दिसून येते आहे. गुजंनने अधिक मेहनत घेतली तर उकृष्ट चित्रकार होवू शकते असे सांगत तिच्या पेटींग विकत घेत जणू आर्शिवादच दिला.  तर माजी परिवहन मंत्री मा. गुलाबरावजी देवकर यांना त्यातील शिवाजी महाराजांचे चित्र सप्रेम भेट दिले. सध्याची मुले अगदी लहान वयापासून मोबाईलशी खेळताना दिसतात, सोशल मीडियावर ऑनलाईन असतात. पण यामुळे त्यांच्या अंगभूत गुणांकडे कमालीचे दुर्लक्ष होते. त्याच्या अगदी उलट गुंजन सावंत यांनी अत्यंत कमी वयात स्केच ड्रॉईंग रेखाटून त्याचे प्रदर्शन भरविले, ही गौरवास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांनी चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. गुजंनचे शिक्षक तरूण भाटे यांनी गुजन म्हणजे खाणीतला हीरा आहे आणि तिला घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.होंडा कटटा गु्रपचे अध्यक्ष संतोष जैन यांनी गुंजनचा सत्कार केला. शहरातील बहिणाबाई उद्यान जवळील पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे हे प्रदर्शन आजपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे, ३ ते १५ सकाळी ११ ते सायंकाळी सातपर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी गुंजन प्रसाद सावंत यांच्यासह भूविकास बँकेचे निवृत्त कर्मचारी व गुंजनचे आजोबा भीमराव सावंत, बाळासाहेब पाटील (आमोदे), चंदू पाटील, धीरज पाटील, कुंदन सावंत, डॉ. नितीन वसंतराव पाटील, गुंजनचे वडील प्रसाद सावंत अनिल पाटील, डॉ. मिलींद समनपुरे यांच्यासह चमगाव व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रर्दशनास भेट दयावी असे आवाहन सावंत परिवारातर्फे करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.