65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात बियॉन्से नॉलेस ,रिकी केज यांचा दबदबा !

0

लॉस एंजेलिस , लोकशाही न्यूज नेटवर्क

लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे यंदाचा 65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारावर लोकप्रिय पॉप गायिका बियॉन्से नॉलेस (Beyonce) आणि भारतीय संगीतकार रिकी केजने (Ricky kej) यांनी लक्ष वेधून पुन्हा पुरस्कारावर नाव कोरले आहे.

भारतीय संगीतकार रिकी केज (Ricky Kej) यांनी पुन्हा एकदा भारताच नाव जगभरात उंचावलं आहे. त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ (Divine Tides) या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम (Best Innersive Audio) या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला आहे. रिकी केज यांनी तिसऱ्यांदा हा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे.

ग्रॅमी पुरस्कार 2023’मध्ये बियॉन्सेने रचला इतिहास

गेल्या 65 वर्षांत बियॉन्सेने 32 वेळा गॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्सेला इलेक्टॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. बियॉन्सेचा जगभरात मोठा चाहतावर्ग असून तिची गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.

ग्रॅमी पुरस्कार 2023’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

सॉंग ऑफ द इयर – बियॉन्से नॉलेस (ब्रेक माय सोल)
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो – अॅडले (इजी ऑन मी)
सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक अल्बम – बियॉन्से नॉलेस (रेनायसान्स)
सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम – केन्ड्रिक लॅमर (मिस्टर मोर्ले अॅन्ड द बिग स्टेपर्स)
सर्वोत्कृष्ट संगीत अर्बना अल्बम (बॅड बनी – अन वेरानो सिन टी)
सर्वोत्कृष्ट समुह सादरीकरण – सॅम स्मिथ आणि किम पेटर्स (अनहोली)
सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम – वीले नेलसॉन – अ ब्यूटीफुल टाईम
सर्वोत्कृष्ट पॉप वोकल अल्बम – हॅरी स्टाईल (हॅरी हाऊस)
सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम – रिकी केज (डिव्हाईन टाइड्स)
सर्वोत्कृष्ट रॅगी अल्बम – द कॉलिंग-कबाका पैयरामिड

 

Leave A Reply

Your email address will not be published.