गुगल मॅपवर आले व्हॉट्सअॅपचे खास फीचर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

व्हॉट्सअॅप हे सध्याच्या सर्व सामान्यांच्या जीवनातील एक महत्वाचे घटक बनले आहे. त्यामुळे ते फक्त एक अॅप नसून जगण्यातील भाग बनले आहे. यासाठी आता सर्वसामान्यांचे आयुष्य आणखीन सुखकर व्हावे म्हणून गुगलने नवीन फीचर व्हॉट्सअॅप सोबत घेऊन आले आहे.

व्हॉट्सअॅपचे रिअल टाइम लोकेशन शेअरिंग फीचर गुगल मॅपमध्ये जोडण्यात आले आहे. या फीचरचा वापर करून यूजर्स त्यांचे सध्याचे लोकेशन शेअर करू शकतील. अँड्रॉईड युजर्सना गुगल मॅपमध्ये हे फीचर मिळायला सुरुवात झाली आहे. गुगल मॅपच्या या फीचरचा फायदा करोडो अँड्रॉइड यूजर्सना होणार आहे. व्हॉट्सअॅपद्वारे, वापरकर्ते त्यांचे वर्तमान स्थान मर्यादित काळासाठी शेअर करू शकतात. गुगलचे हे फीचर वापरण्यासाठी अँड्रॉईड यूजर्सला इतर कोणत्याही अॅपवर अवलंबून राहावे लागणार नाही, ते गुगल मॅप वापरून लोकेशन शेअर करू शकतील.

Leave A Reply

Your email address will not be published.