खरेदीची सुवर्णसंधी ! सोन्याच्या भावात घसरण, पहा नवे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

तुम्ही देखील सोने चांदी खरेदीच्या विचारात असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.  दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर खूपच कमी होते.

गेल्या आठवडय़ात 24 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 61,075 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. तर सोमवारी सोन्याचा हा दर 61238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 163 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 70771 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 71931 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीच्या दरात प्रति किलो 1160  रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावातील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव 60910 रुपये आहे तर चांदीचा भाव 71400 रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.