दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात घसरण !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या दारात घसरण झाली आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा (Gold) चांदीची किंमत (Silver rate) अधिक घसरली आहे.

भारतीय वायदे बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात हाच कल दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत (Gold Rate Today) 0.75 टक्क्यांनी घसरली आहे. आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून एमसीएक्सवर ती 2.04 टक्क्यांनी घसरली आहे.

सोमवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Rate) सकाळी 9:10 वाजता 392 रुपयांनी घसरून 51,585 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याचा भाव आज 51,685 रुपयांवर उघडला गेला. उघडल्यानंतर, किंमत एकदा 51,540 रुपये होती. थोड्या वेळाने तो 45 रुपयांनी वाढून 51,585 रुपयांवर पोहोचला.

त्याचवेळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर 1,239 रुपयांनी घसरून 59,546 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 60,000 पासून सुरू झाला. एकदा किंमत 59,501 रुपये झाली. पण काही काळानंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत 59,546 रुपयांवर व्यवहार सुरू झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.