बाजारात महिलेची सोनसाखळी चोरणाऱ्यास अटक

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

गर्दीचा फायदा घेत एकाने बाजारात गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळविल्याची घटना मागच्या महिन्यात घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनसाखळी लांबविणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी सीसीटीव्ही माध्यमातून अटक केली आहे.

वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोराने चोरली. हि घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. सोनसाखळी घेऊन चोरट्याने धूम ठोकली होती. याच घटनेची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने याबाबत तपास सुरू केला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली. मुद्देमालासह २४ वर्षीय संशयित आरोपी मुकेश भालेराव यास अटक करण्यात आली आहे. मुकेश मुलाचा पाचोरा येथील राहणार असून, कामानिमित्त तो नाशिकच्या टाकली परिसरात राहत होता. गर्दीतून पायी धूम ठोकणारा मुकेश पोलिसांच्या हाती लागल्यानं कामगिरी करणाऱ्या पोलिसांचं कौतुक केलं जातं आहे. लवकरच फिर्यादी महिलेशी संपर्क करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोन्याची पोथ दिली जाईल, असेही पोलिसांकडून माहिती देण्यात आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.