सोन्याचे भाव ३ हजारांनी उतरले !

0

नवी दिल्ली ;– सराफा बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ७०७ रुपयांनी घसरून ५९,६०१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

२२ कॅरेटच्या सोन्याचा भाव ५४,५९५ रुपये झाला. आयबीजेएच्या वेबसाईटनुसार, चांदी ९३५ रुपयांनी उतरून ७१,४२३ रुपये प्रतिकिलो झाली. काही दिवसांपासून साेन्याच्या दरात घट झाली आहे़. सोन्याने ५ मे रोजी ६२ हजार रुपये प्रति तोळ्याची उच्चांकी पातळी गाठली होती़. त्यानंतर महिनाभरात दर ३ हजार रुपयांपेक्षा खाली आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.