जळगावात घरफोडी ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लांबविली

0

जळगाव ;- शहरातील जोशींपेठ मधील कालभैरव मंदिरासमोर असणाऱ्या राज रिफायनरी दुकानाचे शटर वाकवून चॅनल गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सव्वालाखांची चांदी आणि ४० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार १३ जून रोजी सकाळी उघडकीस आला .

याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र राजाराम जगताप वय ३८ हे सोनारी काम करत असून त्यांचे जोशी पेठेत राज रिफायनरी नावाचे दुकान असून अज्ञात चोरटयांनी १ लाख १५ हजार रुपयांची १९२० ग्राम वजनाची चांदी आणि ४० हजारांची रोकड १२ जून ते १३ जूनच्या सकाळी ७ वयाच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत जितेंद्र जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्य्क फौजदार संजय शेलार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.