गहू सोयाबीनच्या दरामध्ये चढ-उतार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

देशातील बाजारात सध्या गव्हाचे दर तेजीत असून सोयाबीनच्या दरातही चढ उतार असल्याचे चित्र दिसत आहे. आता राज्यातील बाजारातही गव्हाची दरवाढ कायम आहे. राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमधील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. त्यामुळ दर वाढले आहेत. सध्या राज्यातील बाजारात गव्हाला सरासरी ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये दर मिळतोय. नवा माल बाजारात येईपर्यंत गव्हाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तसेच देशातील बाजारात सोयाबीन दरात क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ-उतार दिसत आहेत. मात्र सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. आजही प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरात कपात केली होती. तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीन दरवाढीसाठी घटक अनुकूल असतानाही दरात कपात होत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. पण बाजारातील अभ्यासक दरवाढीची शक्यता वर्तवित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.