गाझाच्या नागरिकांना स्थलांतरासाठी तीन तासांचा वेळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे. लष्कराने गाझाच्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. नागरिकांना एक रस्ता दिला असून, गाझाच्या उत्तर भागातून दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्राइल लष्कर गाझा पट्टीचा उत्तर भाग पूर्णपणे ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

इस्राइल डिफेन्स फोर्सने यासंदर्भातील एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘गाझामध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कोणतेही ऑपरेशन लाँच केले जाणार नाही. या काळात नागरिकांनी दक्षिणेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे’. या वेळेनंतर इस्राइल लष्कर तीव्र कारवाईला सुरुवात करणार आहे.

इस्राइलकडून ‘पाथ टू सेफ्टी’ जारी करण्यात आला आहे. सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान गाझाच्या नागरिकांनी यावेळेत या मार्गावरुन दक्षिण भागात सुरक्षित जावे. त्यांना कोणतीही हानी पोहोचवली जाणार नाही. याकाळात कोणतेही ऑपरेशन राबवले जाणार नाही. नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असं इस्राइली लष्कराने म्हटलं आहे.

तुमची आणि तुमच्या परिवाराची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे आमच्या सूचनेचे पालन करावे आणि दक्षिणीकडे जावे. हमासच्या नेत्यांनी याआधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, असं इस्राइलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इस्राइल गाझाच्या उत्तर भागात जमिनी कारवाई करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.