गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू, १७ जण बेपत्ता

0

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड (Gaurikund) येथे दरड कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण बेपत्ता झाले आहे. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढीगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये ४ स्थानिक लोक आणि १६ नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून (SDRF) शोध राबवली जात आहे.

उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यतील गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे डोंगरावरून आलेल्या मोठ्या ढिगाऱ्यात रस्त्यालगतची दोन दुकाने आणि ढाबे वाहून गेले. या दुकानांमध्ये आणि ढाब्यांमध्ये ४ स्थानिक लोक आणि १६ नेपाळी वंशाचे लोक होते. एसडीआरएफकडून शोध मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारी गौरीकुंड धरण पुलियाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली २० जण दबले गेले होते. यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, १७ जणांचा शोध घेण्यासाठी शनिवारी सकाळपासून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

प्रशासनाने केले सावध राहण्याचे आवाहन
गौरीकुंडजवळ दरड कोसळण्याच्या घटनेनंतर उत्तरकाशीच्या सीमावर्ती जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सर्व लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. भूस्खलन होण्याच्या प्रवण भागात सुरक्षित रहदारीची काळजी घ्यावी, पावसात बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. उत्तरकाशी जिल्हा पोलिसांनीही एक सूचना जारी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.