राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जी. एच. रायसोनी स्कूलच्या ऋतुजा भंडारीची चमकदार कामगिरी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील इयत्ता नववीची विध्यार्थिनी ऋतुजा हर्षल भंडारी हिने नुकतेच उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मोठे यश संपादन केले आहे. तिने 4×50 या मिक्स रिले प्रकारात रौप्य पदक तर २०० मीटर या प्रकारात कांस्य पदक मिळवत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

या अनुशंगाने विजयी ठरलेल्या ऋतुजा भंडारी हिचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले आहे. तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे ऋतुजाला मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.