व्यवसाय वाढीचे आमिष देऊन व्यापाऱ्याला आठ लाखात गंडविले

0

जळगाव:  व्यवसायवाढीचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील व्यापाऱ्याला  ८ लाख २१ हजारांना गंडवले. हा प्रकार ८ फेब्रुवारी ते ११ एप्रिल दरम्यान घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील शेख निसार शेख वजीर (२६, रा. आझाद नगर, विवरे बु.) यांचा आयुर्वेदिक उत्पादने विक्रीचा व्यवसाय आहे. शेख यांच्या मोबाईलवर मेघा, गजेंद्र आणि मयंक तिवारी यांनी संपर्क साधला. यावेळी विया ट्रेड ही कंपनी तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करेल असे आमिष दाखवले. तिघांनी वेळोवेळी शेख यांच्याकडून ८ लाख २१ हजार रुपये उकळले. जाहिरातबाजीमधून कोणताही फायदा होत नसल्यामुळे शेख यांनी वेबसाईट तपासण्याचे ठरवले. तेव्हा वीया ट्रेड नावाची कोणतीही वेबसाईट नसल्याचे समोर आले. यानंतर शेख यांनी त्या तिघांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शेख यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. डी. जगताप करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.