आयकराची रक्कम देण्याच्या नावाखाली हेडमास्तरची पावणेतीन लाखात फसवणूक

0

रावेर;-आयकराची रक्कम मिळवून देण्याच्या नावाखाली तांदलवाडीच्या उर्दू शाळेच्या हेडमास्तराची एका व्यक्तीने पावणेतीन लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून एका विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नाजीमुद्दीन अजीम उद्दीन फारुकी राहणार मारूळ तालुका यावल हे तांदळवाडी येथे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांना 25 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते उर्दू शाळेत असताना ऋतिक यादव नावाच्या इसमाचा फोन आल्यावर त्याने त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्यातील माहिती प्राप्त करून त्यांच्या खात्यामधून दोन लाख 79 हजार 152 रुपये एवढी रक्कम वर्ग करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

 

याप्रकरणी नाझीमुद्दीन फारुकी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला 26 जुलै रोजी दुपारी दीड वाजता तक्रार दिल्यावर ऋतिक यादव नामक इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक कैलास नांगरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.