उन्हाळ्यापूर्वीच विद्युत खांबावर आग

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या जिजाऊ नगरातील खांबावरील विद्युत रोहित्रांने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. वीज वितरण कंत्राटीचा बेजबाबदारपणा व निकृष्ट पद्धतीने वापरले जाणार्‍या वस्तु समोर आल्या आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व कंत्राटी ठेकेदाराला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

तर दुसरीकडे वीज वितरण विभागाला नागरिकांकडून विचारणा केली असता कंत्राटी ठेकेदाराने आमची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे सांगून दोन्ही हात वर केले आहे. कंत्राटी ठेकेदार हा बोगस मटेरियल व कुठल्या प्रकारचे साहित्य वापरत आहे. त्याची क्वालिटी काय आहे. जळालेल्या खांबावरील रोहित्राने पेट घेतांना इतर नागरीकांची पळापळ झाली होती. जर मोठी घटना किंवा मोठा अपघात झाल्यास कोण जबाबदार असणार ?,  याची चौकशी करून संबंधितांवर रीतसर कारवाई करण्यात यावी ही मागणी नागरिक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.