बाप रे..! तब्बल चोपन्न घरफोडीचे गून्हे..!

अट्टल घरफोड्याला शिताफीने केली अटक : महाराष्ट्रासह कर्नाटकातही गुन्हे

0

 

 

भडगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शहरातील चाळीसगांव रोड विद्यानगर येथे दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी सायकांळी साडे सहा वाजेच्या सुमारास प्रकाश दत्तात्रय भोसले वय ५९ या शेतकऱ्याच्या घरातून घरी कोणीही नसतांना दागिने व रोख रक्कम असा सुमारे ११ लाखाचा मुद्देमाल चोरी झाला होता.

राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील जिन्याचे लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडुन चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील बेडरुम मधील कपाटाचे लाँक तोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म मिळुन एकुन १०, ८६, ४००/- रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होतं. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नं. ३७१/२०२३ भादवी. क. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे फिर्यादी प्रकाश दत्तात्रय भोसले वय ५९ धंदा शेती रा. विद्यानगर भडगाव ता. भडगाव यांचे फिर्याद वरुन अज्ञात आरोपी विरुध्द दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करत होते.

 

दरम्यान भडगाव पोलीसांनी तांत्रीक विश्षलेशनाच्या आधारे तपास करुन सदर गुन्ह्याचा तपासात प्रशांत काशिनाथ करोशी वय ३८ रा. हाऊस नं. २१ मौजे इस्पुर्ली ता. करवीर, जि. कोल्हापुर हा यांने चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली. त्याला वर्धा ता. जि. वर्धा येथुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी चोरी केल्याची कबुली देवुन चोरी करुन नेलेल्या सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्क्म पैकी १२० ग्रॅम सोने एकुण ८, ६४, ००० रुपयांचे काढुन दिले. सदर मुद्देमाल रायपुर (छत्तीसगड) येथुन जप्त करण्यात आला.

 

आरोपीच्या आरोपाचा लेखाजोखा

सदर आरोपी हा आंतरराज्यीय अट्टल घरफोडी करणारा असुन त्याचेवर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सुमारे ५४ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. संशयीत आरोपी यास भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडी चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपुस व इतर गुन्हे उघडकीस आणण्याकामी त्यास दिनांक २५ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीला भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ०७ दिवासांची पोलीस कस्टडी दिली आहे.

 

या पथकाने केली कामगिरी

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, पो. हे. काँ. किरण रवींद्र पाटील, पो. काँ. प्रवीण कडु परदेशी, पोकाँ संदिप भटु सोनवणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर नारायण डोमाळे, हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.