एकीकडे दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; मात्र…

केंद्राची १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी..

0

 

अहमदनगर

 

दुधाला ४० रुपये दर अपेक्षित असताना २२ ते २५ रुपये दर मिळतो. हा सरकारने टाकलेला दरोडा आहे; असा आरोप करत शेतकऱ्यांनी दूध दरासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार- घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

 

दर वाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला किमान ४० रुपये दर करावा अशी मागणी केली.

 

केंद्र सरकारचा अजब प्रकार

मात्र एकीकडे शेतकरी दूध दरवाढीवरून आक्रमक झाले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला. सरकारने आगोदर राज्यातील दूध भेसळ रोखवी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 

बैठक मान्य नाही : शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी न बोलावता केवळ शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्याना निमंत्रित करण्यात आल्याने ही बैठक आम्हाला मान्य नाही; अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

 

दरम्यान मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सरकारी कार्यालयांसह मंत्रालयात शेण ओतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू; असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

सांगलीतही शेतकरी आक्रमक

महाराष्ट्र इनाम जमिनी खालसा करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप जमिनी खालसा झाला नसल्याने शेतकरी वर्ग उदासीन आणि चिंतेत आहे,या बाबत विधानसभेत चर्चा होऊनही अंमलबजावणी नाही. शिवाय दूध संघाकडून आणि खाजगी दूध संघाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून २६ ते २७ रुपये गाईचे दूध खरेदी करून ग्राहकांना ५८ ते ६० रुपये विकत आहेत. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव देत असल्याने या निषेधार्थ आज पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करून जोपर्यंत गाईच्या दुधाला ४० रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.