‘या’ प्रसिद्ध गायकाने ऑनस्टेज घेतला अखेरचा श्वास (व्हिडिओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गॉस्पल सिंगर म्हणून लोकप्रिय असलेल्या हेन्रिक नावाच्या गायकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मुलाचा ब्राझीलचा असणारा हेन्रिक हा स्टेजवर गात असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानं वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानं चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

ब्राझीलच्या एका धार्मिक कार्यक्रमामध्ये हेन्रिक सहभागी झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये तो गाणं सादर करत होता. एकाचवेळी तो गायन आणि श्रोत्यांशी संवाद साधत होता. तेव्हा तो अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.