तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या तरुणास अटक

0

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा आरोपी केतन मधुकर पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारींसह न्हावी येथून अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमी मिळाली की, न्हावी ता.यावल गावातील वाणीवाडा भागात राहणारा केतन पाटील याचेकडे तलवार असून तो तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवित असतो.

त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुढे सो जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शना खाली किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पो.हे.कॉ. महेश आत्माराम महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय गिरधर चौधरी यांचे पथक तयार करुन न्हावी गावात जावून केतन मधुकर पाटील (वय २७, रा. वाणीवाडा न्हावी ता.यावल) यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने त्याचे राहते घरातून ३ तलवार काढून दिल्याने त्याचे विरुध्द फैजपूर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ए.पी.आय सिद्धेश्ववर आखेगावर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. राजेश बऱ्हाटे, देविदास सरदार, महेंद्र महाजन, श्रीकांत इंगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.