बापरे… जीलेटीनचा स्फोट घडवत तरुणाची आत्महत्या…

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मेळघाट येथील कळमखार गावात एके ३५ वर्षीय तरुणाने चक्क जिलेटीनच्या (gelatin) कांड्यांचा स्फोट (Blast) घडवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामू गायकवाड असे मृत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, मजूर असलेला रामू याचे पत्नी सोबत वाद सुरु होता. त्यामुळे ती तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. त्याने रात्री जिलेटीनच्या कांड्या स्वतःभोवती बांधल्या आणि स्फोट घडवून आत्महत्या केली. मोठा आवाज झाल्याने आजू-बाजूचे लोक धावत आले तेव्हा पाहिलं तर त्याच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे आजूबाजूला दिसले.

घटनेची माहिती धारणी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन  मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दरम्यान, या पूर्वीही धारणी तालुक्यातील ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे माशांची शिकार करताना परिसरातील अनेकांना आपले हात गमवावे लागले आहेत. त्यामुळे ब्लास्टिंगचे (Blasting) जिलेटीन (gelatin) कुठून येतं?, त्याची विक्री (Sale) कोण करतं?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची सखोल तपास करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता यातून काय खुलासा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.