तालुका कृषी कार्यालयाला आग, २ लाख ८८ हजाराचे नुकसान

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव रस्त्यालगत ओम शांती नगरात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह शासकीय कार्यालयातील अभिलेख आदी कार्यालयाचे साहित्य जोडून खाक झाले. एरंडोल नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने जवळपास ३० मिनिटात आगीवर नियंत्रण केले.

अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकले नाही. विशेष हे की शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे कृषी कार्यालय बंद होते. बंद कार्यालयाला अचानक आग लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत कृषी सहाय्यक चंद्रकांत सैंदाणे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. सुनील लोहार, राजेश पाटील, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.