अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सजली एरंडोल नगरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल येथे अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्या निमित्त संपूर्ण एरंडोल शहरात पांडव नगरी बहुउद्देशीय संस्था व शहरातील विविध हिंदू संघटनांतर्फे संपूर्ण एरंडोल शहरात भगव्या पताका व झेंडे लावून संपूर्ण शहर हे भव्यमय झाले आहे. तर भगवा चौक परिसरात हिंदू बांधवांतर्फे ऑइल पेंट कलर ने रस्त्यावर आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत.

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा ऐतिहासिक सोहळा संपन्न व्हावा यासाठी पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे 22 जानेवारी रोजी शहरात मास विक्री व मध्य विक्री ही दुकाने बंद ठेवण्यात यावी. यासाठी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

20 जानेवारी2024 रोजी सायंकाळी सात वाजता हनुमान मंदिर पांडवळ्याजवळ 108 श्री राम जप सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तर रविवार 21 जानेवारी 2024 राम मंदिर येथे दुपारी साडेतीन ते साडेसात पर्यंत सुंदर कांड आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी साडेआठ ते साडे अकरा वाजेपर्यंत भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मध्यरात्री बारा वाजता अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती 5100 दिवे लावून साकारण्यात येणार आहे.

सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक व नंतर दहा वाजता 56 भोग व सकाळी 11 ते एक आयोध्या येथील मूर्ती स्थापना थेट प्रक्षेपण हे प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात येणार आहे. तर दुपारी दोन ते सहा श्रीराम मंदिर पांडव वाडा, विठ्ठल मंदिर, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, माळीवाडा, भगवा चौक, ज्ञानदीप चौक, या मार्गाने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सात वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे. तर रात्री आठ वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. एरंडोल येथील गेल्या काही दिवसापासून रोज संध्याकाळी महिला मंडळातर्फे श्रीराम जय राम जयघोष करत संध्याकाळी रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, बाल गोपाल मंडळी यांनी आपल्या सायकलीला जय श्रीराम चा भगवा झेंडा लावून शहरात भगवे वातावरण निर्मिती केली आहे. राम मंदिर व शहरातील इतर मंदिरांना देखील रोषणाई व फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.