भरधाव आयशरची जोरदार धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली.

शिवम बाप्पू हटकर (वय २२ रा. पिंपळकोठा ता.एरंडोल) हा दुचाकी (एमएच १९ डीजे १२०४) मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पिंपळकोठा गावाहून जळगावकडे असलेल्या एका पेट्रोल पंपावर गेला. दुपारी ३.३० वाजता पेट्रोल भरून पुन्हा गावात परतत असताना पिंपळकोठा गावाजवळ भरधाव आयशर क्रमांक (एमएच ४८ एवाय ४९५१) याने जोरदार धडक दिली.

या धडकेत शुभम हटकर हा जागीच ठार झाला आहे. तर दुचाकीही चक्काचूर झाली आहे. ही घटना कळताच पिंपळकोठा येथील गावातील नागरिकांनी धाव घेऊन गर्दी केली होती. एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी यांनी धाव घेऊन थांबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने नातवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.