एरंडोल येथे बर्निंग ट्रकचा थरार, जीवित हानी टळली

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भल्या पहाटे जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना भल्या पहाटे दादाश्री पेट्रोल पंपासमोर घडली सुदैवाने प्राणहानी झाली नाही या वाहनातील चालक व क्लिनर दोघ बचावले एरंडोल नगरपालिकेची अग्निशामक गाडी घटनास्थळी येऊन तिने आगीवर नियंत्रण केले.

एरंडोल येथील रहिवासी बाळू पाटील (मूळ रा. उत्राण) यांचा आयशर ट्रक टोळी येथून कुट्टी भरून एरंडोल मार्गे धुळ्याकडे जात होता. सदर ट्रक डोंगराळा तालुका मालेगाव याठिकाणी जात होता. एरंडोल पासून थोड्या अंतरावर ट्रक अचानक पेटला. ही घटना भल्या पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ट्रकचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने पेट्रोल पंपाजवळ असल्यामुळे अनर्थ टळला.

Leave A Reply

Your email address will not be published.