धक्कादायक; इलेक्ट्रिक स्कुटर घेणं बेतले जीवावर, ७ जण जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एक वेळ अशी होती की, इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मध्यंतरी इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये आग लागण्याच्या घटना कमी झाल्या. आता पुन्हा एकदा चिंता वाढणारी बाब समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये स्फोट झाला. त्यात घराचं मोठं नुकसान झाले आहे. कुटुंबातील ७ सदस्य जखमी झाले आहे. हे प्रकरण रायपूरच्या छत्तीसगडमधील कृष्णा नगरचा आहे. डॉक्टर फैजन यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडली. ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. S1 Pro च मॉडेल होतं. डॉक्टर फैजन यांच्या बहिणीने दुर्घटनेनंतर नुकसानीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय ई-स्कुटरमध्ये आग लागल्यामुळे घर आणि सामानाचे खूप नुकसान झालं आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये आणखी काही टू व्हीलर दिसत आहे. आगीमुळे त्या गाड्याच सुद्धा नुकसान झालं. मी २०२३ मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली होती. स्कूटर विकत घेतल्यानंतर एकवर्षाच्या आत ही घटना घडलीय.

 

ओव्हर चार्जिंगमुळे लागली आग?
इलेक्ट्रिक स्कुटर चार्जिंगला लावली होती. रात्री १ वाजेनंतर झोपायला गेले. त्यानंतर काही तासाने ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागली. डॉ. फैजन यांनी सांगितलं की, चार्जिंगबद्दल मी ओलाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ओला इलेक्ट्रिक स्कुटरला ऑटो कट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. आग लागलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर ओव्हर चार्ज केली नव्हती, तरीही ही घटना घडली. या बद्दल कंपनीच काय म्हणण आहे? ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

Leave A Reply

Your email address will not be published.