दिवाळीच्या तोंडावर डाळी आणि खाद्यतेलाचे दर कडाडले !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे, त्यातच ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर महागाईची (Inflation) मोठी झळ बसली आहे. दिवाळीआधी डाळींसह (Dall) खाद्य तेलाच्या (edible oil) किंमती वाढल्या आहेत.

तूर डाळीचा (Tur Daal) भाव गेल्या आठवड्याभरात चार ते पाच रुपयांनी वाढलाय. त्यासोबत उडीद डाळ (Udid dal) आणि खाद्य तेलाच्या किंमतीतही वाढ नोंदवण्यात आलीय. ठोक बाजारसह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरु असल्याचं दिसतंय.

सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलो इतक्या दराने मिळत होती. मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

तसेच खाद्यतेलही 3 ते 4 रुपयांनी महागलंय. यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.