हीरा कॉटनमधुन सव्वा आठ लाख रुपये चोरी

0

चोपड़ा.;- चोपड़ा येथील यावल रस्त्यावर असलेल्या हीरा कॉटन येथील जिनिंग मधे धाड़सी चोरी झाल्याची घटना नुकतीच शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन हीरा कॉटन चे मालक सुनील जैन यांनी दिलेल्या फिर्यादित दिनांक 4जून रोजी रात्री 3ते 3वाजुन 10मिनिट ने अनोळखी4 इसम 25 ते 30वयोगटातील अंगात बनियान तोंडाला रुमाल बाँधलेले त्यापैकी 2ईसमानी सदर ऑफिस च्या उघड़या दरवाज्याने आत प्रवेश करुंन फिर्यादि यांच्या दैनंदिन व्यवहार करीत असलेल्या ठिकाणी कार्यालयाचे कुलुप तोडून दैनिदिन व्यवहारसाठी ठेवलेले 8लाख रुपये 17हजार रोख घेवून पसार झाले. म्हणून चोपड़ा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक के के पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.