भरधाव डंपरने वृद्धाला चिरडले : जळगावातील घटना

0

जळगाव;- रस्ता ओलांडताना वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चिरडल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गुजरात पेट्रोल पंप परिसरात घडली या प्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पुंडलिक भिका पाटील (वय ७५, रा.शिवराणा नगर, जळगाव) असे मयत वृद्ध इसमाचे नाव आहे. शिवराणा नगरात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे यांच्यासह राहत होते. ते सेवानिवृत्त शिक्षक होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते ओवरब्रिज जवळ रस्ता ओलांडत असताना त्यांना भरधाव डंपरने धडक दिली. या धडकेमध्ये ते गंभीर जखमी झाले.

त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नागरिकांनी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ उटगे यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

दरम्यान रामानंदनगर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धावं घेतली. तसेच घटनेची माहिती जाणून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.