शहरातील समस्या त्वरीत सोडवा..!

...अन्यथा तीव्र आंदोलन : डॉ. अश्विन सोनवणे यांचा इशारा

0

 

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील समस्यांचा डोंगर वाढतच असून प्रशासनाकडून त्यावर काहीच उपाययोजना होतांना दिसत नाही. शहरात नियमित सफार्इ होत नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने या समस्या त्वरीत सोडविल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येर्इल असा इशारा माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी दिला आहे. आज दि. 24 रोजी त्यांनी आयुक्तांना या संदर्भात निवेद दिले आहे.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील अनेक समस्यांबाबत तक्रारी होत असतांना देखील त्या ससस्यांचे निवारण महानगरपालिका प्रशासन करतांना दिसत नाही. दिवसेंदिवस समस्यांमध्ये वाढतच होत आहे. जळगाव शहरात साफसफाईचा विषय अत्यंत बिकट झालेला असून गटारी व्यवस्थित साफ केल्या जात नाहीत. त्या चोक-अप झाल्या असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच आता पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यावर त्या गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहतात, त्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात शिरत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून गटारी साफ करण्यात याव्यात व चोक-अप काढण्यात यावे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधी येऊन त्यामुळे विविध आजार उद्भवण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात डेंग्यू सारखे आजार होवू नये म्हणून ॲबेटींग केली जाते परंतु, अजुनपर्यंत ॲबेटींगला सुरुवात झालेली नाही. शहरात बऱ्याच ठिकणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाऱ्याचा सामना करावा लागत आहे. ते पथदिवे त्वरीत सुरू करण्यात यावेत. या समस्यांचा त्वरीत निपटारा झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येर्इल असा इशारा डॉ. अश्विन सोनवणे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.