ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरु राहणार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षांना ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसीमधील ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजेच्या परवानगीवर बंदी घाल्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या याचिका फेटाळल्या आहेत. व्यासजी तळघरात पूजा नियमित सुरु राहील असा निर्णय न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणी मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

३१ जानेवारी रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदू धर्मीयांना पूजा करण्याची परवानगी दिली होती, त्यानंतर वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था मशीद समितीच्यावतीने आव्हान देण्यात आले होते.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पुजारी पूजा करू शकतो असा निर्णय दिला होता. वाराणसी जिल्हा न्यायालयाने शैलेंद्र कुमार पथक यांच्या याचिकेवर हा आदेश दिला असून, त्यांचे आजोबा सोमनाथ व्यास यांनी डिसेंबर १९९३ पर्यंत पूजा केली होती. पाठक यांनी वंशपरंपरागत पुजारी म्हणून त्यांना तळघरात प्रवेश करून पुन्हा पूजा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. मशिदीत चार ‘तळघरे’ (तळखाने) आहेत आणि त्यापैकी एक अजूनही व्यास कुटुंबाच्या मालकीचा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.