“कुवारखेडे” येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून,  मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयातील कर्मचारी बी.जी. नाईक आणि भूषण जाधव यांच्या आर्थिक योगदानातून जळगांव तालुक्यातील  “कुवारखेडे” या गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटांचे आज दि. २३/७/२०२२ रोजी समाज सेवेच्या स्वरूपात वाटप करण्यात आले.

यादरम्यान शाळेच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्यध्यापिका जयश्री पाटील, उपशिक्षिका योगिता मराठे,  सरपंच मंगलाबाई सपकाळे आणि अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी फिरोज पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी पालकांची आणि गावकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.